Maharashtra Rains | उद्यापासून पुण्यात मुसळधार पाऊस?, IMD कडून आज ‘या’ 10 जिल्ह्यांना इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  अरबी समुद्रासह (Arabian Sea) बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव म्हणून पुणे, मुंबईसह राज्यात पावसासाठी (Maharashtra Rains) पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर केले आहे. परंतु आता आंदमानच्या समुद्रात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होत आहे. पुढील 24 तासात याची तीव्रता वाढणार आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात पुढील 5 दिवस अनेक ठिकाणी पावसाची (Maharashtra Rains) शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर पुढील 5 दिवस हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला आहे.

 

आज 10 जिल्ह्यांना येलो अलर्ट

 

आज (शनिवारी) दक्षिण कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह (Thunderstorm and lightning) जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 5 दिवसांसाठी हवामान विभागाने राज्यातील विविध ठिकाणी येलो अलर्ट (Yellow alert) दिला आहे. हवामान खात्याने आज (शनिवार) सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि बीड या 10 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

उद्यापासून पुण्यात मेघगर्जनेसह पाऊस

 

ऑक्टोबर महिन्यात पावसाने उघडपी घेतल्यानंतर 1 नोव्हेंबर पासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या (Rain in Maharashtra) सरी कोसळत आहेत.
नैऋत्य मोसमी पाऊस परतल्यानंतर ईशान्य मान्सूनच्या सरी पुण्यातही कोसळल्या (Rain in Pune) आहेत.
उद्यापासून पुढील चार दिवस पुण्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता (Maharashtra Rains) वर्तवण्यात आली आहे.
पुढील चार दिवस पुण्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. या चार दिवसांत पुण्यासह दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र,
घाट परिसर, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

Web Title : Maharashtra Rains | heavy rainfall alert in pune from tomorrow imd give yellow alert for 4 days to these 11 district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Dilip Walse Patil | ‘आमच्या पोलिसांचा मला अभिमान’ ! गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून पोलिसांचे तोंडभरून कौतुक

Reserve Bank of India | ‘RBI’ ची मोठी कारवाई ! ग्राहकांना महाराष्ट्रातील ‘या’ बँकेतून फक्त 1 हजार रुपयेच काढता येणार

Pune Crime | डॉक्टर पतीला डॉक्टर पत्नीला पोटगी देण्याचे न्यायालयाचे आदेश