Maharashtra Rains | उद्यापासून राज्यात पाऊस, ‘या’ दोन दिवशी पुण्यात मेघगर्जनेसह कोसळणार सरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – यांदाचे नैऋत्य मोसमी वारे माघारी परतल्यानंतर महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी पावसाने (Maharashtra Rains) पूर्णपणे उघडीप दिली आहे. परंतु आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी (Maharashtra Rains) पोषक हवामान निर्माण झाले आहे. उद्यापासून म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची (Heavy rainfall) शक्यता आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्या श्रीलंका (Srilanka) आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी परिसरात (Coastal area of Tamil Nadu) हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र (low pressure area) पश्चिम दिशेने पुढे सरकणार आहे. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी येत्या आठवड्यात पावसाची स्थिती (Maharashtra Rains) आहे. आज (रविवार) राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात असली तरी पावसाची शक्यता नाही.

5 जिल्ह्यांना येलो अलर्ट

सोमवार (दि.1 नोव्हेंबर) पासून पुढील चार दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने (IMD) उद्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. मंगळवार (दि.2) पासून राज्यातील पावसाचा जोर (Maharashtra Rains) वाढेल. मंगळवारी राज्यात सातारा, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. तर पुणे, रायगड, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या पाच जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

 

3 आणि 4 नोव्हेंबरला पुण्यात पाऊस
3 आणि 4 नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
या दोन दिवशी पुण्यात (Pune Rain) पावसाची हजेरी लागणार आहे. या दोन दिवसांसाठी पुण्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत.

 

Web Title :- Maharashtra Rains | heavy rainfall possible in maharashtra from 1st november imd give yellow alert for next 4 days to Sindhudurg, Ratnagiri, Sangli, Satara and Kolhapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 79 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

SBI Quick | एसएमएस आणि मिस्ड कॉलद्वारे सुद्धा चेक करू शकता SBI अकाऊंट बॅलन्स, जाणून घ्या प्रक्रिया

Dhantrayodashi 2021 | यावेळी धनत्रयोदशीला केवळ 1 रुपयात खरेदी करा सोने, जाणून घ्या काय आहे पद्धत?