Maharashtra Rains | विकेंडला राज्यात मुसळधार ! पुण्यासह 11 जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  तामिळनाडू (Tamil Nadu) आणि आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) किनारपट्टी परिसरात सध्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. पुढील एक-दोन दिवसांत हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 11 नोव्हेंबरपर्यंत या दोन राज्यांच्या किनारपट्टी भागात जोरदार पावसाची (Maharashtra Rains) शक्यता आहे. संबंधित परिसरात हवामान खात्याने (IMD) रेड अलर्ट (Red alert) जारी केला. याचा काहीअंशी परिणाम महाराष्ट्रवर देखील होणार आहे. त्यामुळे विकेंडला महाराष्ट्रात काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Maharashtra Rains) शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

महाराष्ट्रात विकेंडला मुसळधार

 

विकेंडला महाराष्ट्रातील कोकण, घाट परिसर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Maharashtra Rains) शक्यता आहे.
हवामान खात्याने शनिवार (13 नोव्हेंबर) आणि रविवार (14 नोव्हेंबर) पुण्यासह 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे.
शनिवारी राज्यात पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
या जिल्ह्यात विकेंडला विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी (Maharashtra Rains) कोसळणार आहेत.

 

रविवारी मुसळधार ते अतिमुसळधार

 

संबंधित जिल्ह्यात वेगवान वारे वाहणार असून या वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतका असणार आहे.
रविवारी देखील राज्यात हीच परिस्थिती राहणार आसून हवामान खात्याने 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिली आहे.
शनिवार आणि रविवार दोन्ही दिवशी पुण्यात मुसळधार पावसाची (Heavy rains in Pune) शक्यता आहे.
त्यामुळे विकेंडला लांबचा प्रवास टाळावा असा सल्ला हवामान खात्याने पुणेकरांना दिला आहे.

 

पुण्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद

 

दुसरीकडे दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लक्ष्यद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर गेल्यानंतर राज्यात आकाश निरभ्र झालं आहे.
तर उत्तर पूर्व परिसरात हवेचा दाब वाढल्याने राज्यात किमान तापमानात बरीच घट झाली आहे.
मागील दोन दिवसांत पुण्यातील तापमानाचा पारा घसरला आहे.
राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद पुण्यात झाली आहे.
आज पहाटे पुणे जिल्ह्यातील हवेली याठिकाणी सर्वात कमी 10.3 अंस सेल्ससिअस एवढ्या तापनाची नोंद झाली.
त्यामुळे पुण्यात पहाटे वातावरणात प्रचंज गारवा वाढला आहे.

 

Web Title : Maharashtra Rains | heavy rainfall possible in maharashtra on weekend imd give yellow alert to 11 districts including pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MPSC Exam | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! MPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एका वर्षाची मुदत वाढ

PF Account | तुमच्या पीएफ खात्यामध्ये व्याजाचे पैसे कोणत्या हिशेबाने आले; जाणून घ्या

Mumbai Police | विराट कोहलीच्या मुलीवर अत्याचार करण्याची धमकी देणार्‍या ‘इंजिनिअर’च्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या;