Maharashtra Rains | राज्यात पुन्हा होणार मुसळधार पावसासह गारपीट?, ‘या’ 9 जिल्ह्यांना ‘हाय’ अलर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात बदल (Climate Change) झाला आहे. उत्तर भारतात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव निर्माण झाल्याने पुढील 5 दिवस राज्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस (Maharashtra Rains) कोसळणार आहे. तर काही ठिकाणी गारपीटीची (Heavy Rainfall with Thunderstorm) शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवडा आणि विदर्भाला सतर्कतेचा इशारा (Maharashtra Rains) दिला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सध्या उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे वायव्य भारत आणि लगतच्या मध्य भारतात अरबी समुद्रातून उच्च आर्द्रता पुरवठा होणार आहे. पुढील दोन दिवस हवामानाची ही स्थिती कायम राहणार आहे. परिणामी पुढील तीन ते चार दिवसात मध्य भारतावर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून वारे एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 5 दिवसांत महाराष्ट्रात विजांच्या गडगडाटासह पाऊस आणि गारपीट (Maharashtra Rains) होण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना येलो अलर्ट

हवामान खात्याने आज नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.तर काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. तसेच आज मुंबई, ठाणे, पालघर, अहमदनगर, बीड आणि लातूर या जिल्ह्यांत देखील ढगाळ हवामानाची (Cloudy Weather) नोंद झाली आहे. येथेही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर 10 ते 12 जानेवारी दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Web Title :-  Maharashtra Rains | heavy rainfall with hailstorm possibilities in maharashtra for next 5 days imd give yellow alert to Nandurbar Dhule Jalgaon Nashik Aurangabad Jalna Parbhani Hingoli and Nanded

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Five State Assembly Election-2022 | उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा राज्यांतील विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं; जाणून घ्या सर्व तारखा

 

Post Office MIS | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 10 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांचे उघडा अकाऊंट, दर महिना मिळेल 2500 रुपयांची उत्पन्न; जाणून घ्या

 

Pune Crime | धक्कादायक ! 10 वीत शिकणाऱ्या मुलाची राहत्या घरात आत्महत्या; पुण्याच्या कर्वेनगरमधील घटना

 

Sara Ali Khan | सारा अली खान कोणाला करतेय डेट? बॉयफ्रेण्डची मालमत्ता किती?