Maharashtra Rains | मुंबईसह राज्यात रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rains | मागील काही आठवड्यात पावसाने राज्यात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर पावसाने उघडकीप केली. त्यानंतर आता पोषक वातावरण निर्माण झालं आहे. पश्चिम बंगालच्या (West Bengal) उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आता पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. रविवारपासून मुंबईसह (Mumbai) राज्यात (Maharashtra Rains) पाऊस कोसळणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आगामी 4 ते 5 दिवस गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी आणखी तीव्र होईल. त्यानंतर आगामी 24 तासामध्ये ते ओडिशा किनाऱ्याजवळ सरकणार आहे. त्यामुळे राज्यात (Maharashtra Rains) सर्वत्र पावसाची शक्यता आहे. अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर (Krishnananda Hosalikar) दिली आहे. त्यामुळे विश्रांतीनंतर रविवार 26 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार आहे.

दरम्यान, रविवारपासून राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे.
तसेच राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर याचा प्रभाव विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रावर राहील.
कोकण आणि मुंबईत याचा प्रभाव अधिक जाणवणार आहे. तसेच, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.
याचा प्रभाव आणखी वाढणार असून उत्तर आणि उत्तर, पश्चिम दिशेने ते पुढे सरकणार आहे.
अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग शास्त्रज्ञ शुभांगी भुते (Shubhangi Bhute) यांनी दिली.

Web Titel :- Maharashtra Rains | Heavy rains expected in Mumbai and other parts of the state from Sunday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nagpur Crime | धक्कादायक ! ‘या’ कारणामुळं महिलेनं You Tube वरील व्हिडीओ पाहून पोटातलं बाळ ‘पाडलं’, केला गर्भपात; जाणून घ्या प्रकरण

Solapur Accident | सोलापूर-धुळे हायवेवर चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार दुभाजकाला धडकली, 2 ठार

Pune Corporation | महापालिकेत 3 कोटीचा अपहार झाल्याचा शिवसेनेच्या नीलेश गिरमेंचा आरोप, म्हणाले – संबंधितांवर गुन्हे दाखल करा’