Maharashtra Rains | राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण ! मुंबईत पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढला; लोकल सेवा विस्कळीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rains | गेल्या अनेक दिवसापासून मोसमी पावसाच्या (Monsoon) प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्रातील (Maharashtra Rains) नागरीकांना एक आनंदाची बातमी आहे. सध्या मोसमी पाऊस तळकोकणात (Konkan) दाखल झाला आहे. तसेच, महाराष्ट्रातील काही भागात पावसाचे वातावरण निर्माण झालं आहे. काल (शुक्रवारी) सांयकाळच्या सुमारास मुंबई (Mumbai), पुण्यासह (Pune) काही जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान, मुंबईत आज (शनिवारी) पहाटेपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावलीय. त्यामुळे वाशी ते ठाणे लोकल सेवा (Vashi To Thane local) ठप्प झाली आहे.

 

हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department-IMD) अंदाजानुसार, काल आणि आज पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्या पद्धतीने पाऊस बरसत असताना दिसत आहे. आज सकाळी रिमझिम पाऊस सुरु आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि उपनगरांमध्ये पाऊस सुरु आहे. या पावसाचा तडाखा रेल्वेला देखील बसला आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway) अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. तर हार्बर मार्गावरही गाड्याही उशिराने धावत होत्या. तर ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते वाशी सेवा पूर्णत: ठप्प होती. तांत्रिक कारणामुळे ही सेवा बंद असल्याचे जारी केले आहे. (Maharashtra Rains)

दरम्यान, गोव्याच्या (Goa) सीमेवर रेंगाळलेला मोसमी पाऊस (Rains) सिंधुदुर्गात (Sindhudurg) दाखल झाला आहे. काल शुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसत आहेत. मोसमी पाऊस सिंधुदुर्गात दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने (IMD) दिली आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला आहे. 2 दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असून आजही काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Web Title :- Maharashtra Rains | heavy rains in mumbai since early morning maharashtra monsoon updates

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा