Maharashtra Rains | राज्यात पुढील 4 ते 5 दिवसांत दमदार पाऊस कोसळणार; हवामान खात्याचा ‘Alert’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rains | जुलै महिन्यापासून राज्यात पावसाने (Maharashtra Rains) धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन आठवड्यामध्ये राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली. जोरदार पावसामुळे सर्वत्र जलमय वातावरण झाले असून अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान आगामी चार ते पाच दिवसामध्ये राज्यात अनेक भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळणार असल्याचं भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department-IMD) सांगितले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा दमदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे.

 

 

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील नद्यांना पूर आले आहे. पूर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने अनेक ठिकाणी रेस्क्यु फोर्स आणि एनडीआरएफच्या तुकड्या पाठवल्या होत्या. मात्र आता पावसाचा जोर कमी झाला असल्याने नद्यांची पाणीपातळी पुन्हा घटली आहे. पावसाची रिपरिप कमी झाल्याने नागरीकांना बाहेर पडण्यास काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान आता पुढील 4 ते 5 दिवस आणखी जोरदार पाऊस बरसणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. (Maharashtra Rains)

दरम्यान, या महिन्यातील पावसाने कोकण, मुबंई, सातारा, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. तसेच, आता पुन्हा एकदा पुढील चार-पाच दिवस पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने (IMD) राज्यभर अलर्ट (Alert) जारी केला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

 

Web Title :- Maharashtra Rains | heavy rains in upcoming 4-5 days in maharashtra imd alert

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा