Maharashtra Rains | आगामी 4 ते 5 दिवस गडगडाटांसह जोरदार पावसाचा IMD चा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rains | मागील दोन आठवड्यामागे पावसाने दमदार हजेरी लावली होती. राज्यात धुवाधार पाऊस गरजला होता. नंतर काही दिवस हवामानात बदल होऊन पावसाने मंद गती घेतली. मात्र, आता महाराष्ट्रात (Maharashtra Rains) आगामी 4 ते 5 दिवसांत गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे. पण राज्यात सध्या अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आगामी 4 ते 5 दिवसात राज्यातील अनेक भागात पावसाचे पोषक हवामान राहणार असून रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या समुद्रकिनारच्या जिल्ह्यांना पावसाचा (Rain) सर्वाधिक फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यातील (Maharashtra Rains) काही भागात जोरात तर काही भागात सरी कोसळणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज आहे. त्यामध्ये सातारा, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांतील डोंगराळ भागात पावसाची शक्यता अधिक आहे. तसेच, नाशिक, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, जळगाव, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस (Rain) होणार आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून शेतकऱ्यांनी पिकांची काढणी सुरू केली आहे.
अशा परिस्थितीत मान्सूनच्या सरी पुन्हा कोसळणार असल्यामुळे कापणी केलेल्या पिकांचं संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी शेतकऱ्यांवर असणार आहे.
दरम्यान, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत कोकणातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पावसाचं प्रमाण कमी असेल.
त्याचप्रमाणे सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया
या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवला आहे.

Web Title :- Maharashtra Rains | IMD warns of heavy rain with thunderstorms for the next 4 to 5 days in various parts of maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आरोप; म्हणाले – ‘जलयुक्त शिवार बंद केल्यामुळे नद्यांना महापूर’

Pune Crime | पुण्यातील बीअर शॉपी बंद करण्यासाठी गेलेल्या पोलीस हवालदाराला मारहण; चौघांना 13 वर्षानंतर सक्तमजुरीची शिक्षा

Aryan Khan Drug Case | शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ‘एवढे’ दिवस राहणार एनसीबीच्या कोठडीत