Maharashtra Rains | मुंबई-पुणेकरांनो विकेंडला घरीच थांबा, IMD कडून ‘या’ जिल्ह्यात पावसाचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rains | मागील काही दिवसांपासून राज्यात कोरड्या हवामानाची (Dry Weather) नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, खान्देश (Khandesh) आणि उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) थंडीचा (Cold Wave) कडाका कायम आहे. मात्र त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. येत्या विकेंडला (Weekend) राज्यात कोकण आणि मध्य मराष्ट्रातील काही ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसाची (Maharashtra Rains) शक्यता हवामान तज्ज्ञांनी (Meteorologist) व्यक्त केली आहे.

 

विकेंडला पावसाची शक्यता
शनिवारी (दि.22) आणि रविवारी (दि.23) कोकणासह मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शनिवारी पुण्यासह, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, रत्नागिरी आणि रायगड या 11 जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. याठिकाणी विकेंडला ढगाळ हवामान राहणार आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या (Rain in Maharashtra) सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही जर विकेंडला कोकणात फिरायला जायचा प्लॅन बनवत असाल तर विशेष काळजी घेण्याची गरज आहे. (Maharashtra Rains)

 

 

तर 23 जानेवारी रोजी हवामान खात्याने रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) या दोन जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. या दोन जिल्ह्यात रविवारी तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर पुढील काही दिवस खान्देश (Khandesh), विदर्भ (Vidarbha) आणि मध्य महाराष्ट्रात दाट धुक्यासह गारठा कायम राहणार आहे. त्यानंतर 21 आणि 22 जानेवारी रोजी संबंधित विभागात तुरळक ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दाट धुके
दुसरीकडे 21 ते 23 जानेवारी दरम्यान पश्चिम हमालय (Western Himalayan) परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची (Heavy Rainfall) शक्यता आहे. दरम्यान तुरळक ठिकाणी हिमवर्षाव (Snowfall) होण्याची शक्यता आहे. तर 22 जानेवारी रोजी हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) पावसासह बर्फवृष्टी होणार आहे. तर उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि बिहारमध्ये (Bihar) पुढील तीन दिवस दाट धुके पडणार आहे.

 

 

Web Title :- Maharashtra Rains | light to moderate rainfall and cloudy weather possible in konkan and central maharastra on weekend

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajesh Tope | राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

 

Pooja Hegde Instagram | कडाक्याच्या थंडीत पूजा हेगडेने चढवला इंटरनेटचा पारा, बिकिनी फोटोंमुळे चाहते झाले घायाळ

 

LIC Kanyadan Policy | LIC च्या कन्यादान पॉलिसीत दररोजच्या गुंतवणुकीवर मिळेल मोठी रक्कम, मिळू शकतात जवळपास 27 लाख