Maharashtra Rains | अरबी सुमद्रात नवं संकट ! राज्यात पुढील 5 दिवस अतिशय महत्त्वाचे, मुंबई-पुण्याला IMD चा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन दक्षिण अंदमान समुद्राच्या क्षेत्रात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यानंतर, आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात (Arabian Sea) हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र (Low Pressure Area) निर्माण होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील हे नवं संकट पुढील 24 तासात सक्रिय होणार आहे. त्यामुळे पुढील 5 दिवस राज्यातील कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) आणि मराठवाड्यात (Marathwada) अनेक ठिकाणी जोरदार पावसाची (Maharashtra Rains) हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने (IMD) राज्यातील विविध जिल्ह्यांना पुढील पाच दिवसांसाठी तीव्र पावसाचा (Maharashtra Rains) इशारा दिला आहे. आज पुण्यासह 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert in Pune) जारी केला आहे.

13 जिल्ह्यांना येलो अलर्ट

 

आज पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, बीड, लातूर आणि नांदेड या 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
या जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 तासांत विजांच्या कडकडाटासह (Thunderstorm and lightning) जोरदार पावसाची (Maharashtra Rains) शक्यता आहे.
दरम्यान या 13 जिल्ह्यांत वेगाने वारे वाहणार असून 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं हे वारे वाहतील.
परभणी आणि हिंगोलीत तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसणार आहेत.

 

उद्या पावसाचा जोर वाढणार

 

मंगळवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
पुढील 4 दिवस दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते
अतिमुसळधार (Heavy rain) पावसाची शक्यता आहे.
आजपासून पुढील 5 दिवस पुण्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर 16 ते 18 नोव्हेंबर दरम्यान मुंबई आणि ठाण्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

Web Title : Maharashtra Rains | low pressure area rise in arabian sea heavy rainfall alert in maharashtra for next 5 days including pune mumbai IMD Alert

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप, व्हिझ्डम् क्रिकेट क्लब संघांचा सलग तिसरा विजय ! पुनित बालनची पाच विकेटची कमिगिरी

Earn Money | नोकरी करता करता अतिशय अल्पशा भांडवलात सुरू करा ‘हे’ व्यवसाय, दरमहा होईल चांगलीच ‘कमाई’, जाणून घ्या

Mumbai NCB | मुंबई एनसीबीची नांदेडमध्ये मोठी कारवाई ! 4 कोटींचा गांजा जप्त