Maharashtra Rains | पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rains | दडी मारलेल्या पावसाने पुन्हा पडण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. सध्या गणेशोत्सवाचे दिवस असून आगामी चार दिवसात विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Maharashtra Rains) शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे हवामानात बदल झाला असून चार ते पाच दिवसात पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबईसह राज्यभरात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने आपला जोर कायम ठेवला आहे. मुंबईत सातत्याने सरीवर सरी कोसळत असून, शुक्रवारी श्री गणेशाचे स्वागत देखील वरूण राजाने थाटामाटात केले. शनिवारी देखील पावसाचा जोर कायम होता.
पालघर, ठाणे, रायगडला ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र येथे पावसाचा जोर कायम राहील. तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, १३ आणि १४ सप्टेंबर रोजी गोवा, कोकण याठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागने दिला आहे.
Web Titel :- Maharashtra Rains | next four days torrential rains state including mumbai
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update