Maharashtra Rains | ‘महाराष्ट्रात आगामी दोन दिवस पावसाची शक्यता’ – IMD

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Maharashtra Rains | राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Maharashtra Rains) जोर धरला आहे. महाराष्ट्रातील मोठ्या शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर, पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह आगामी 2 दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे.

 

कालपासून सोलापूरात 22 मिलिमीटर, आणि अमरावतीमध्ये 7 मि.मी. पावसाची (Maharashtra Rains) नोंद झाली आहे.
दरम्यान, दिवसभरात राज्यात सोलापूर आणि अमरावती वगळता अन्य ठिकाणी पाऊस पडलेला नाही.
तर, महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान 34 अंश सेल्सिअस अकोल्यात, तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे 14.5 अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले आहे.
कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्राबरोबरच विदर्भ तसेच मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता (IMD) वर्तविली आहे.

 

दरम्यान, अंदमानच्या समुद्रात गेल्या आठवडय़ात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचा परिणाम राज्याच्या (Maharashtra Rains) हवामानावर झाला.
सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन हलकी थंडी गायब झाली आणि आकाश अंशत: ढगाळ झाले. या काळात कोकणात काही भागांत पाऊस झाला.
त्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले.
दरम्यान, महाराष्ट्रात आगामी 24 तासामध्ये पावसाळी परिस्थती कायम राहणार आहे.

 

Web Title : Maharashtra Rains | Rain likely in Maharashtra for next two days -Indian Meteorological Department

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Harshvardhan Patil | हे तर शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणारे सरकार, हर्षवर्धन पाटील यांचा आरोप

Anil Parab | अनिल परबांच्या शासकीय निवासस्थानावर फेकली काळी शाई (व्हिडीओ)

Suresh Lad | अजित पवार कोकण दौऱ्यावर असताना रायगड जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, राष्ट्रवादीला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण