Maharashtra Rains | महाराष्ट्रात आगामी 2 दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार, IMD चा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rains | मागील सप्टेंबर महिन्यात राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. राज्यातील काही भागात पावसाचा तडाखा बसला आहे. या झालेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने मराठवाडा आणि विदर्भ या भागांना अधिक फटका बसला आहे. दरम्यान, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर राज्यात पावसाने विश्रांती घेतली. तेव्हापासून राज्यात पाऊस गायब झाला. मात्र, पुन्हा मान्सुन बरसणार असल्याच हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रात (Maharashtra Rains) आगामी दोन दिवसामध्ये ढंगाच्या गडगडाटांसह पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली (IMD) आहे.

 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं त्याचा परिणाम म्हणून हा पाऊस होईल, अशी माहिती हवामान खात्याच्या पुणे विभागाचे वैज्ञानिक के. एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी दिली आहे. बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याचं त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस (Rain) पडेल. विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, आज (शनिवार) पहाटे हवेचं किंचित गारवा होता तर मुंबई अजूनही दमट व गरम वातावरण आहे. राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे.

नंदुरबार, गोंदिया, भंडारा, पालघर, ठाणे, अहमदनगर, बीड, रायगड, पुणे, उस्मानाबाद, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग
या जिल्ह्यांत पाऊस बरसणार आहे. मात्र, धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार, जालना, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, लातूर, परभणी, जालना,
औरंगाबाद, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर बुलढाणा, परभणी, हिंगोली, नांदेड
चंद्रपूर या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस (Maharashtra Rains) कोसळणार असल्याचं
हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) सांगण्यात आलं आहे.

 

Web Title :- Maharashtra Rains | Rain with thunderstorm in Maharashtra in next 2 days, IMD warns

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | बॉयफ्रेंड बनवण्याच्या उतावळेपणाने केले कंगाल, लावला तब्बल 73 लाखांचा चूना

Diabetes | डायबिटीज रूग्णांनी कधीही करू नयेत ‘या’ 6 चूका, आरोग्य होईल बरबाद; जाणून घ्या

Pune Crime | ‘एक भी पोलीसवाला ढंग का नही है, पैसा कमाने के लिए खडे हो क्या?’ पुण्यात कारचालकाने वाहतूक पोलिसास नेले 800 मीटर फरफटत