Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस


पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –
Maharashtra Rains | डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात फारसा पाऊस (Maharashtra Rains) पडत नाही. मात्र, लक्ष्यद्वीपपासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बुधवारी राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर जोरदार पाऊस झाला. डिसेंबर महिन्यातील विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

 

आतापर्यंतच्या इतिहासात इतका मोठा पाऊस डिसेंबर महिन्यात यापूर्वी पडला नव्हता. पुणे शिवाजीनगर येथे आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ७५.४ मिमी पावसाची नोंद (Pune Rains) झाली आहे. यापूर्वी १३ डिसेंबर २०१४ रोजी एकाच दिवसात सर्वाधिक ५३.१ मिलीमीटर पाऊस बरसला होता. पुणे, मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी जोरदार (Mumbai Rains) पाऊस झाला आहे.

आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पुणे शिवाजीनगर ७५.४ मिमी, पाषाण १०५.५ मिमी, चिंचवड १०३ मिमी, लवळे ७५ मिमी, मगरपट्टा ६५ मिमी, माळीन ६५ मिमी, तळेगाव ६४ मिमी, दौंड ५२ मिमी, डुडुळगाव ७८ मिमी, वडगावशेरी १२७ मिमी, पुरंदर ७२ मिमी, राजगुरुनगर ६४ मिमी, हवेली ११५ मिमी, भोर ७३ मिमी, आंबेगाव ५५ मिमी, शिरुर २८ मिलीमीटर इतका जोरदार पाऊस पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पडला आहे.

त्याचबरोबर मुंबई ९० मिमी, सातांक्रूझ ९१ मिमी, सांगली ५७ मिमी , कोल्हापूर ६९ मिमी, डहाणु ११४ मिमी, नाशिक ६३ मिमी,
बारामती ५० मिमी, मालेगाव ५५ मिमी, मामोगोवा ६२ मिमी, भायखळा १०० मिमी, जुहू एअरपोर्ट ९३ मिमी,
अहमदनगर २० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

आजही राज्यातील बहुतांश ठिकाणी आकाश ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस (Maharashtra Rains) पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
रात्रभर पाऊस बरसल्यानंतर गुरुवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतली असली तरी दाट धुके आणि बोचरे वारे यामुळे थंडी मोठ्या प्रमाणावर वाजत आहे.त्यामुळे पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी रेनकोट घालायचा की थंडी वाजू नये, म्हणून स्वेटर घालावा, असा संभ्रम लोकांना पडला आहे.

Web Title : Maharashtra Rains | Record rainfall in many places in the state including Mumbai and Pune; Find out where and how much rain fell

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार,
नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक