Maharashtra Rains | येत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार पाऊस, IMD चा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लक्षद्वीप (Lakshadweep) मालदीवजवळ (Maldives) चक्रीवादळाच्या पट्ट्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. या द्रोणीय भागामुळे महाराष्ट्रात पावसाची (Maharashtra Rains) स्थिती निर्माण झाली आहे. पुढील 24 तासात राज्यातील कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी मुसळधार पावसाचा (Maharashtra Rains) अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.

 

 

मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने (Rain in Maharashtra) हजेरी लावली आहे. राज्यातील कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी पाऊस पडत आहे. मागील काही दिवसांत या भागातील ढगाळ वातावरणामुळे पिकांवर परिणाम होत आहे. आता पुन्हा याच भागात पुढील 24 तासात मुसळधार पावसाची (torrential rain) शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

34 अरेबियन सी म्हणजे लक्षद्वीप, मालदीवजवळ चक्रीवादळाच्या पट्ट्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. या द्रोणीय भागामुळे आज राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि कोकणात याचा प्रभाव जाणवणार आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच पालघर, नंदुरबार, धुळे या ठिकाणी मेघगर्जनेसह (thunder) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

 

 

मागील दोन ते तीन दिवसांपासून दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप येथे चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे.
या ठिकाणाहून पूर्व-मध्य अरबी समुद्र, मालदीव लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र (Low pressure area) निर्माण झाले आहे.
त्यामुळे राज्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्यातील काही भागाला येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे.
तर काही भागात ओरेंज अलर्ट (Orange alert) हवामान खात्याने दिला आहे. आता पुन्हा पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

 

Web Title :- Maharashtra Rains | weather in maharashtra upcoming 24 hours heavy rain in konkan Maharashtra Rains

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा