Maharashtra Rains | विकेंडपासून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ 4 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून अलर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विश्रांती घेतलेला पाऊस (Maharashtra Rains) आता पुन्हा जोरदार हजेरी लावणार आहे. आज राज्यात अनेक ठिकाणी पाऊस दडी मारणार असल्याचं हवामान खात्याकडून (IMD) सांगण्यात आलं असलं तरी उद्यापासून म्हणजेच रविवारपासून राज्यात मुसळधार पावसाचा (Maharashtra Rains) इशारा देण्यात आला आहे. राज्यात रविवारी नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या चारही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची (Heavy rain) शक्यता आहे. तर इतर ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार आणि मंगळवारी काही ठराविक ठिकाणी पावसाचा जोर (Maharashtra Rains) वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 19 सप्टेंबर म्हणजे रविवारपासून पुढचे तीन दिवस हे राज्यात पावसाचे असणार आहेत. या दिवसांमध्ये उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत शेतीची कामे करावीत अशा सूचना दिल्या आहेत.

मागील काही दिवसांपासून हवामानात काही अंशी बदल झाला असून राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्टाचा उत्तर भाग, गुजरात (Gujarat) व राजस्थान (Rajasthan) या भागात ढगाळ वातावरण दिसत असल्याने हवामान विभागाने (Meteorological Department) पावसाची शक्यता वर्तवलीय. मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा सर्वसाधरण स्थितीच्या दक्षिणेकडे कायम असून पालोदी अजमेर सह जमशेदपूर दिघा ते बंगालच्या उपसागरापर्यंत पाऊस सक्रीय झाला आहे. तर अरबी समुद्रापासून गुजरात पूर्व राजस्थान या भागात कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

मध्य प्रदेश (Madhya Pradesh), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), महाराष्ट्र उत्तर भाग, गुजरात व राजस्थान या भागात पाऊस सक्रीय होण्याची चिन्ह असून म्यानमारच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही प्रणाली उद्या (19 सप्टेंबर) ओडिसा पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. दरम्यान 19 सप्टेंबर पासून पुढचे तीन दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Web Titel :- Maharashtra Rains | will rain in madhya pradesh uttar pradesh maharashtra north gujarat and rajasthan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न; वारजे माळवाडीच्या रामनगर येथील घटना

Multibagger Stocks | 7.13 रुपयांचा स्टॉक झाला 718 रुपयांचा, 1 लाखाचे झाले 10 कोटी, तुमच्याकडे आहे का?

Pune Police Combing Operation | गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे ‘कोंबिंग ऑपरेशन’ ! 13 कोयते, 2 तलवारी जप्त