ज्योतिषांपेक्षा भाजप नेत्यांचे निवडणूक निकालांविषयी भाकितं अचूक : राजू शेट्टी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन –  अनेक राजकीय अभ्यासकांची निवडणूक निकालाबाबची भाकितं चुकली, पण भाजप नेत्यांनी निकालाबाबत व्यक्त केलेला अंदाज खरा ठरतो. कारण निकाल काय असेल, याचं टेक्निक भाजप नेत्यांकडे आहे, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला.

अनेक अभ्यासकांची निवडणूक निकालाबाबची भाकितं चुकली, पण भाजप नेते, त्यातल्या त्यात चंद्रकांत पाटील निवडणूक निकालाबाबत जे बोलत आले आहेत, ते तंतोतंत खरं ठरतं. जोतिषांनी मांडलेली भाकीत खरी ठरत नाहीत, पण भाजप नेत्यांनी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरतो, कारण निकाल काय असेल, याचं टेक्निक भाजप नेत्यांकडे आहे, अशी बोचरी टीका राजू शेट्टी यांनी केली. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते.

ईव्हीएमच्या संशयावरुन आता सर्व विरोधीपक्ष आवाज उठवत आहेत, मात्र निवडणूक आयोगाकडून या पक्षांना आमच्या आरोपाबाबत ठोस उत्तर मिळत नाही. त्यामुळे भविष्यात ईव्हीएमवरुन जनआंदोलन उभारले जाऊ शकते, असा आशावादही शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या समस्सेवर बोलतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या साखर कारखानदारी नको, या वक्तव्यावरुनही राजू शेट्टींनी केंद्र सरकारवर टीका केली. साखर उद्योग अडचणीत येण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे. कच्ची साखर परदेशातून येऊ द्यायला नको होती, जर परदेशातील साखर आली नसती तर भारतातील साखरेला दर मिळाले असते आणि साखर उद्योग स्थिर राहिला असता असे राजू शेट्टी म्हणाले.

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

Loading...
You might also like