‘जावई’ माझंही ऐकत नाही आणि उद्धव ठाकरेंचंही ऐकत नाही : रावसाहेब दानवे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील राजकीय वाद आता वेगळ्या वळणावर येऊन थांबले आहेत एकीकडे चंद्रकांत पाटिल आणि हर्षवर्धन जाधव एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे वेगवेगळी विधाने करून वाद थांबवण्याऐवजी वाढवताना दिसून येत आहेत. शिवस्वराज्य पक्षाचे प्रमुख आणि जावई हर्षवर्धन जाधव माझंही ऐकत नाही आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचंही ऐकत नाही, असे यावेळी  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले. यातून दानवेंनी जावयापुढे हतबल असल्याचेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे.

पुढे बोलताना दानवे म्हणाले की, “हर्षवर्धन जाधव यांना निवडणूक लढवू नका असे मी समजावले, पण त्याचा काही परिणाम झाला नाही. त्यांनी माझं ऐकलं नाही. उद्धव ठाकरे यांनाही जावयाला समजावून सांगण्यास सांगितले, पण त्यांनी त्यांचेही ऐकले नाही. त्यांचा स्वतःचा पक्ष आहे, त्यामुळे ते कुठूनही निवडणूक लढवू शकतात. त्यांच्या अनेक पिढ्या राजकारणात आहेत त्यामुळे त्यांना माझ्या मदतीची गरज नाही.

नेमकं प्रकरण काय आहे प्रकरण :
औरंगाबादमध्ये  चंद्रकांत जाहीर हे महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत तर हर्षवर्धन जाधव अपक्ष लढत आहेत. निवडणुकीदरम्यान त्यांनी एकमेकांवर आरोपांच्या अनेक फैरी झाडल्या मात्र, मतदान पार पडल्यानंतरही औरंगाबादमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. शिवसेना-भाजपने युती करुन निवडणूक लढवली असली, तरी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी भाजपच्या मदतीवर शंका व्यक्त करत, थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर युती धर्म मोडल्याचा आरोप केला आहे.

Loading...
You might also like