Corona वाढत असतानाही Maharashtra चा पुन्हा लॉकडाऊनला नकार, जाणून घ्या कारण

मुंबई : महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी झी न्यूजशी विशेष चर्चा करताना सांगितले की, दिवाळीच्या दरम्यान लोक बाहेर निघाल्याने राज्यात कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढली आहेत. तरीही ठाकरे सरकारचा महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही.

कोरोना प्रोटोकॉल न पाळल्यास मिळाणार शिक्षा
राजेश टोपे यांनी म्हटले की, महाराष्ट्रात कोरोनावर नियंत्रणासाठी टेस्टिंग वाढवल्या जात आहेत. जे लोक सरकारच्या कोविड प्रोटोकॉलचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सरकारने कोरोना कंट्रोल करण्यासाठी नवे निर्देश जारी केल आहेत. परंतु, अनेक लोक त्यास गांभिर्याने घेत नाहीत. अशा लोकांविरूद्ध पुढील 2-4 दिवसात सक्ती केली जाईल.

महाराष्ट्रात येणार्‍यांना द्यावे लागेल कोरोना फ्री सर्टिफिकेट
त्यांनी म्हटले की, दिल्ली, गुजरात, राजस्थानमध्ये सुद्धा कोरोना वाढत आहे. यासाठी त्या राज्यातून महाराष्ट्रात येणार्‍यांना कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. हिवाळ्यात महाराष्ट्रासह देशभरात कोरोना केस वाढण्याची शक्यता आहे. हे पहाता राज्यात आयुष विभागाने अ‍ॅडवायजरी जारी केली आहे. लोकांनी ती वाचून तिचे पालक केले तर कोरोनापासून वाचता येऊ शकते.

कोरोना वॅक्सीनच्या वितरणासाठी टास्क फोर्स
त्यांनी म्हटले की, वॅक्सीन आपल्या देशात येईल, याची तारीख ठरलेली नसली तरी महाराष्ट्रात वॅक्सीन आल्यानंतर तिचे वितरण करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. यासाठी राज्य सरकारने टास्क फोर्स स्थापन केला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची एकुण 16 लाख 58 हजार प्रकरणे
महाराष्ट्रात कोरोनाची एकुण 16 लाख 58 हजार प्रकरणे आहेत. यापैकी 84 हजार 238 सक्रिय केस आहेत. महाराष्ट्रात कोरोनामुळे आतापर्यंत 46 हजार 683 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्य देशातील सर्वात कोरोना प्रभावित राज्यांमध्ये टॉप 5 पैकी एक आहे. ज्यावर पंतप्रधानांनी सुद्धा चिंता व्यक्त केली आहे.