Maharashtra Registrars Office Open On Holiday | घर खरेदी-विक्री नोंदणी करणार्यांसाठी गुड न्यूज ! आता सुट्टीच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Registrars Office Open On Holiday | राज्य सरकारने घर खरेदी-विक्री नोंदणी करणार्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता जिल्हा मुख्यालय आणि महानगरपालिका क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी देखील सुरू राहणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. आगामी काळात नॉनस्टॉप दस्त नोंदणी होणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले आहे. (Maharashtra Registrars Office Open On Holiday)
अलिकडील काळामध्ये खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. सर्वसामान्यांना त्यांच्या कामाच्या वेळत दस्त नोंदणी करणे शक्य होत नाही आणि दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये देखील गर्दी वाढत असल्याने सुट्टीच्या दिवशी देखील दस्त नोंदणी करता यावी म्हणून हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
पुणे विभागातील (सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर), मुंबई विभागातील (मुंबई शहर, उपनगर), कोकण विभागातील (ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड, अलिबाग), नागपूर विभागातील (नागपूर), अमरावती विभागातील (अकोला, अमरावती), छत्रपती संभाजीनगर विभागातील (छत्रपती संभाजीनगर), लातूर विभागातील (लातूर, नांदेड), नाशिक विभागातील (नाशिक आणि जळगाव) येथील जिल्हा मुख्यालय आणि महानगरपालिका क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालये शनिवारी आणि रविवारी या सुट्टीच्या दिवशी देखील सुरू राहणार आहेत.
Web Title :- Maharashtra Registrars Office Open On Holiday | Good news for home buyers! Now the registrar
offices will be open even on holidays
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update