दिलासादायक ! राज्यातील ‘कोरोना’मुक्त रुग्णांची संख्या 1.5 लाखाच्या उंबरठ्यावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच असला, तरी देखील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. राज्यातील कोरोनामुक्त रुग्णसंख्या आता दीड लाखाच्या उंबरठ्यावर आली असल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 3340 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.15 टक्के असून आतापर्यंत 1 लाख 40 हजार 325 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 173 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. राज्यात मृत्यू होण्याचे प्रमाण 4.04 टक्के आहे. 3340 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 325 रुग्ण बरे झाले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.15 टक्के झाले आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 19.3 टक्के इतके आहे. आतापर्यंत राज्या 13 लाख 17 हजार 895 नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात आले असून यामध्ये 2 लाख 54 हजार 427 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात 173 रुग्णांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाल असून आतापर्य़ंत 10289 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. सध्या 6 लाख 86 हजार 150 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 87 हजार 801 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात 1 लाख 3 हजार 516 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. या रुग्णांवर राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात नोंद झालेल्या 173 नोंद झालेले मृत्यू हे मुंबई मनपा44, ठाणे मनपा 22, नवी मुंबई मनपा 10, कल्याण डोंबिवली मनपा 5, उल्हासनगर मनपा 1, भिवंडी-निजापूर मनपा 2, मीरा-भाईंदर मनपा 2, पालघर 1, वसई-विरार मनपा 7, रायगड 1, पनवेल मनपा 1, नाशिक 1, नाशिक मनपा 7, धुळे 2, जळगाव 2, पुणे 5, पुणे मनपा 22, पिंपरी चिंचवड मनपा 10, सोलापूर मनपा 3, कोल्हापूर 1, रत्नागिरी 1, औरंगाबाद 1, औरंगाबाद मनपा 5, जालना 3, लातूर 1, बीड 1, नांदेड 3, अकोला मनपा 1, गोंदिया 1 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील 1 अशी नोंद आहे.