Coronavirus : दिलासादायक ! गेल्या 24 तासात राज्यातील 19932 रूग्णांनी केली ‘कोरोना’वर मात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 19932 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ते रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आज दिवसभरात कोरोनाचे 11 हजार 921 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर 180 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.

सध्या राज्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ही 13 लाख 51 हजार 153 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 10 लाख 49 हजार 947 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात कोरोनाचे 2 लाख 65 हजार 033 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. कोरोनामुळं राज्यात आतापर्यंत 35 हजार 751 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट 77.71 टक्के इतका आहे. राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर 2.65 टक्के एवढा आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like