दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात विक्रमी 32 हजार रुग्ण झाले ‘कोरोना’मुक्त

पोलीसनामा ऑनलाईन, मुंबई, दि. 21 सप्टेंबर : महाराष्ट्र राज्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव कायम असला तरी आज पुन्हा एकदा राज्याला मोठा दिलासा मिळालाय. महाराष्ट्र राज्यात आज दिवसभरात सुमारे 32 हजार 07 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंतचा हा एकाच दिवसातील करोनामुक्तांचा नवा उच्चांक ठरलाय. महाराष्ट्र राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 74.84 इतक्या टक्क्यांवर गेले आहे.

महाराष्ट्र राज्यात मागील चार दिवसांपासून सातत्याने करोनावर मात करणार्‍या रुग्णांचा आकडा वाढतोय. दयरोज नवा उच्चांक पाहायला मिळत आहे. मागील 24 तासांत महाराष्ट्र राज्यात सुमारे 32007 रुग्ण करोनामुक्त झाले. आतापर्यंत एकूण 9 लाख 16 हजार 348 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

महाराष्ट्र राज्यातील रिकव्हरी रेट सातत्याने वाढत आहे. याचा सरकार आणि आरोग्य यंत्रणांना खूप मोठा दिलासा ठरलाय. एकीकडे करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे, आज मृत्यूचे प्रमाण आणि नवीन रुग्णांची संख्याही अधिक प्रमाणात कमी झालीय.

मागील काही दिवस 20 हजारावर दैनंदिन रुग्णसंख्या वाढ होती. तो आकडा आज 15 हजारांपर्यंत खाली गेलाय. आज दिवसभरात 15 हजार 738 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर महाराष्ट्र राज्यात 344 रुग्ण करोनामुळे दगावले आहेत.

महाराष्ट्र राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्याही कमी होऊन 2 लाख 74 हजार 623 इतकी झालीय. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 59 लाख 12 हजार 258 नमुन्यांपैकी 12 लाख 24 हजार 380 नमुने पॉझिटिव्ह ( 20.71 टक्के) आलेत.

महाराष्ट्र राज्यात 18 लाख 58 हजार 924 लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या 35 हजार 517 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहे. महाराष्ट्र राज्यातील मृत्यूदर सध्या 2.7 टक्के इतका आहे.

महाराष्ट्र राज्यात मागील चार दिवस सातत्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण उच्चांक नोंदवत आहे. शुक्रवारी महाराष्ट्र राज्यात 22 हजार 78 रुग्ण करोनावर मात करून बरे झालेत. त्यानंतर शनिवारी राज्यात 23 हजार 501 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

रविवारी हा आकडा वाढून 26 हजार 408 वर पोहचलाय. तर आज सुमारे 32 हजार 07 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. नवा उच्चांक नोंदवला गेलाय. महाराष्ट्र राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण काल 73.17 टक्के होते ते आज 74.84 टक्के इतका झालाय.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like