‘कोरोना’बाधितांच्या संख्येत महाराष्ट्रानं फ्रान्सला मागे टाकलं, दिवसभरात 4878 नवे रूग्ण तर 245 जणांचा मृत्यू, आकडा 1.74 लाख पार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसचे 4878 रुग्ण आढळून आले आहेत. दररोज निदान होणाऱ्या रुग्णांच्या एक दिवसांची संख्या थोडी कमी झाल्यासारखे वाटत असतानाच राज्याचा एकूण कोरोना बाधितांचा आकडा पावणे दोन लाखांपर्यंत पोहचला आहे. पण त्याच वेळी रुग्ण बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचीसख्याही वाढत आहे. फ्रान्ससारख्या एकेकाळच्या कोरोना हॉटस्पॉटपेक्षा जास्त रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळून आले आहेत. worldometers.info च्या आकडेवारीनुसार फ्रान्समध्ये 164260 कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात 174761 कोरोना बाधित रुग्ण आहेत.

राज्यात गेल्या 24 तासामध्ये 4878 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचीसंख्या 174761 इतकी झाली आहे. आज नव्याने 1951 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून राज्यात आतापर्यंत 90911 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज दिवसभरात 245 कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाल्याची नोंद आहे. यामध्ये गेल्या 48 तासांत 95 तर आधीच्या काही दिवसातले मिळून 150 असे एकूण 245 मृत्यूची नोंद आज करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोविड मृत्यूदर भारताच्या इतर राज्यांच्या तुलनेत अजूनही जास्त आहे.

राज्यात 75979 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबई महानगर भागातच यातील 50 हजाराहून अधिक रुग्ण आहेत. तर पुणे परिसराचा आकडा 10 हजारांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या या महानगरांसह 12 जिल्ह्यांमध्ये उद्यापासुन कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.22 टक्के आहे. तर मृत्यूदर 4.49 टक्के आहे. राज्यात सध्या 578033 लोक होम क्वरंटाईन आहेत तर 38866 संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like