Coronavirus in Maharashtra : राज्यात ‘कोरोना’चे 3 लाखांपेक्षा जास्त रूग्ण अ‍ॅक्टीव्ह, जाणून घ्या गेल्या 24 तासातील आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशभरात सर्वत्र वाढत आहे. राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे तब्बल 35 हजार 726 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर तब्बल 166 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 14 हजार 523 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 26 लाख 73 हजार 461 वर जाऊन पोहचला आहे. त्यामध्ये समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 23 लाख 14 हजार 579 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळं तब्बल 54 हजार 73 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात कोरोनाचे 3 लाख 3 हजार 475 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत.