Maratha Reservation | घटना दुरूस्ती शिवाय मराठा समाजाला आरक्षण अशक्य – ॲड. प्रकाश आंबेडकर

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी दुसऱ्या टप्प्यातील लढ्याला बुधवारी कोल्हापुरातून मूक मोर्चाने सुरुवात झाली.
यावेळी खासदार संभाजीराजे, वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) हे देखील उपस्थित होते.
त्यामुळे आंबेडकर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मात्र त्यांनी जाहीर भाषण टाळत केवळ पाठींबा दर्शवला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, सुरुवातीपासूनच आमची मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे हि भूमिका होती.
पण केंद्र सरकारने १०२ केलेली दुरुस्ती अडसर ठरत आहे.
कायदेशीर सवलतीसह आरक्षण हवे असल्यास घटना दुरुस्ती करण्यास केंद्र सरकारला भाग पाडावे लागेल, अशी सूचना त्यांनी मांडली.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

संभाजीराजे म्हणाले, राज्य सरकारने गुरुवारी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी आवताण दिले आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो.
चर्चेसाठी आम्ही अभ्यासू समन्वयक, तज्ज्ञांना सोबत घेऊन जाणार आहोत.
२१ जूनला नाशिकमध्ये मूक आंदोलन करण्याचे नियोजन आहे.
त्यापूर्वी आजच्या चर्चेत आम्ही मांडलेल्या मागण्यांची पूर्तता सरकारकडून झाल्यास नाशिकमध्ये आंदोलनाऐवजी विजयोत्सव साजरा करण्यात येईल, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोनातून बरे झाल्यानंतर इन्फेक्शन झाल्याने सध्या रुग्णालयात उपचार घेत असतानाही खासदार धैर्यशील माने सलाइनच्या पिनसह आंदोलनात सहभागी झाल्याने त्यांच्याकडे सर्वांचेच लक्ष वेधले.

मूक आंदोलनाच्यानिमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार संभाजीराजे बुधवारी सकाळी समोरासमोर आले.
शाहू महाराजांच्या समाधीस्थळी आल्याआल्या पाटील यांनी संभाजीराजे यांना आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे पत्र दिले. त्याचबरोबर मी पुण्याचा लोकप्रतिनिधी आहे.
त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत जी भूमिका मांडायची आहे ती मी पुण्याला मांडेन.
इथे मराठा समाजातील एक नागरिक म्हणून मी आलो आहे असे त्यांनी सांगितले.

पुणे ते मुंबई असा लाँगमार्च काढण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे.
परंतु आज चर्चा होणार आहे. त्यात सकारात्मक चर्चा म्हणजे काही ठोस अशी भूमिका स्पष्ट होईल असे वाटते. त्यामुळे या चर्चेतून काही तरी साध्य होईल असा निर्णय सरकारने घ्यावा अन्यथा लाँगमार्च काढला जाईल.असेही खासदार संभाजीराजे म्हणाले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : maharashtra reservation marathas only if constitution amended prakash ambedkar

हे हि वाचा

शेतकर्‍यांची फसवणूक करण्यास पकडण्यासाठी तब्बल 3 दिवस लावला दिल्लीत ‘सापळा’; 1.75 कोटींची केली होती फसवणूक

 

Ministry of Defence | संरक्षण मंत्रालयात 10 वी पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या

 

6 कोटी लोकांना EPFO ने दिला मोठा दिलासा ! नोकरी सुटल्यानंतर सुद्धा मिळेल ‘ही’ खास सुविधा, जाणून घ्या