Maharashtra Rojgar Melava 2022 | 75 हजार जागांच्या भरतीला सुरुवात, फडणवीसांनी केलं ‘हे’ आवाहन (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rojgar Melava 2022 | महाराष्ट्रात वर्षभरात 75 हजार नोकऱ्या देण्याचा निश्चय सरकारचा आहे. त्याची सुरुवात आजपासून झाली. 2 हजार जणांना नियुक्तीपत्र (Appointment Letter) देण्यात आले. हे आकडे पुढे वाढत जातील. पण हा शेवटचा अटेम्प्ट किंवा शेवटची संधी समजू नका, कोर्टात जाऊन जागा अडवू नका किंवा स्थगिती आणू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) महाराष्ट्रात वर्षभरात 75 हजार रोजगार देण्याचा निश्चय केला आहे. या महासंकल्प रोजगार मेळाव्याची (Maharashtra Rojgar Melava 2022) सुरुवात आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली.

18 हजार जागांची पोलीस भरती

येत्या काळात साडे अ़ठरा हजार पोलीस भरतीची जाहिरात (Maharashtra Police Recruitment) काढत आहोत. ग्राम विकास विभागात (Rural Development Department) देखील आपण काही पदांची भरती करणार आहोत. सरकारी नोकऱ्या या पारदर्शी झाल्या पाहिजेत. मागच्या काळात जे घोटाळे पाहायला मिळाले तसे होणार नाही. देशात ज्या बेस्ट एजन्सी आहेत त्यांना काम दिलं पाहिजे असा आम्ही निर्णय घेतल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

प्रकल्प का गेले? कोणामुळे गेले?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईत आयोजित रोजगार मेळाव्यात
(Maharashtra Rojgar Melava 2022) बोलताना वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) आणि
टाटा एअरबस प्रकल्प (Tata Airbus project) महाराष्ट्रातून बाहेर कसे गेले यावर भाष्य केले.
तसेच राज्यात अनेक नवे उद्योग आणत असल्याची माहिती त्यांनी दिली. एकनाथ शिंदे म्हणाले,
दोन-तीन प्रकल्प कुठे गेले हे आरटीआयमधून (RTI) समोर आलं आहे. त्यातून सत्य समोर येईल. प्रकल्प का गेले? कोणामुळे गेले? कधी गेले? हे समोर येईल. उपमुख्यमंत्र्यांनीही पुराव्यानिशी मांडलं आहे. असे शिंदे म्हणाले. तसेच आम्ही नवे उद्योग आणत असून त्यात राज्याचं हित आहे. यामुळे राज्यातील तरुणांना फायदा होईल, राज्य स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title :-  Maharashtra Rojgar Melava 2022 |maharashtra rojgar melava 2022 job fair eknath shinde devendra fadnavis govt to give 75000 jobs nokri to marathi youth

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supriya Sule | कवितेच्या माध्यमातून खा. सुळेंचे संभाजी भिडेंवर टीकास्त्र ‘तू लाव टिकली, परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली‘

MNS | ’50 खोके सामाना ‘OK’, शिंदे-फडणवीस सरकारच्या जाहिरातीवर मनसेचा शिवसेनेला खोचक टोला