Maharashtra Sadan Fire | दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही (Video)

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –  येथील महाराष्ट्र सदनात राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षाला शॉर्ट सक्रिटमुळे आग (Maharashtra Sadan Fire) लागल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळवले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी (Maharashtra Sadan Fire)झाली नाही.

दरम्यान, घटनास्थळी दिल्ली पोलिसांचेही एक पथक घटनास्थळी पोहोचल्याची माहिती मिळाली आहे. सोमवारी सकाळी महाराष्ट्र सदनात राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षाला आग लागली.
माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी तातडीने रवाना झाल्या.
आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहेत.

Pune-Bangalore Highway | शुक्रवारपासून बंद असलेली पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक आज सुरु होण्याची शक्यता

Pune News | भाजपच्या महिला नगरसेविकांना 'एकाधिकारशाही'चा असाही फटका ! महापौर, स्थायी समिती अध्यक्ष,

 पीएमपी संचालक पदाच्या दावेदार 'तापकीर' यांची 'पक्ष उपाध्यक्ष ' पदावर 'बोळवण'

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | शहर भारतीय जनता पार्टीतील ‘एकाधिकारशाही’ वागणुकीची एकापाठोपाठ एक उदाहरणे समोर येवू लागली आहेत. महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि पीएमपी संचालक पदाच्या प्रमुख दावेदार ज्येष्ठ नगरसेविका वर्षा तापकीर (varsha tapkir)
यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने पुण्यात (Pune News) महिला कार्यकर्त्यांमध्ये धुसफुस सुरु झाली आहे.

धनकवडी (Dhankawadi) सारख्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यातुन सलग 4 वेळा पुणे महापालिकेत (pune corporation) भाजपचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वर्षा तापकिर (varsha tapkir) या 2017 मध्ये महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर महापौर पदाच्या दावेदार होत्या. परंतु भाजपने पहिल्या वर्षी मुक्ता टिळक (mukta tilak) यांना या पदावर संधी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रा प्रमाणे किमान सव्वा वर्ष महापौर पदी संधी मिळेल अशी तापकीर यांची अपेक्षा होती.
मात्र टिळक यांनाच अडीच वर्षाचा कालावधी देण्यात आला.

यानंतर पाच वर्षामध्ये किमान भाजप कडून महिलांना एक वर्ष स्थायी समिती अध्यक्ष पदी संधी देण्यात येईल,
त्यामध्ये तापकीर यांची वर्णी लागेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती.
परंतु शेवटच्या वर्षी देखील हेमंत रासने (hemant rasane) यांनाच दुसऱ्यांदा संधी देण्यात आल्याने तापकीर यांचा हिरमोड झाला.
यामुळे नाराज झालेल्या तापकीर यांची मनधरणी करण्यासाठी पीएमपीएमएलचे (PMPML) संचालक पद देण्याचे पक्षाने मान्य केले… more update’s  Just Click Here