Maharashtra Sadan Scam | भुजबळांच्या दोषमुक्ततेला ‘लाचलुचपत’चा विरोध, ACB चा न्यायालयात युक्तीवाद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी (Maharashtra Sadan Scam) तपास यंत्रणेकडे आपल्यावर कारवाई करण्याइतपत पुरावे नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दोषमुक्ततेसाठी विशेष न्यायालयात काही दिवसांपूर्वी अर्ज केला आहे. त्याला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau) विरोध केला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी (Maharashtra Sadan Scam) भुजबळ व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दोषमुक्त करण्यासाठी केलेल्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यावेळी एसीबीने युक्तिवाद केला.

महाराष्ट्र सदनचे नूतनीकरणाचे काम कंत्राटदार के. एस. चमणकर इंटरप्रायझेस (contractor. S. Chamankar Enterprises) यांना मिळाले होते. त्यांनी भुजबळ व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लाच दिल्याचे पुरावे एसीबीकडे (ACB) आहेत, असे सांगितले. या याचिकेवरील सुनावणी 21 ऑगस्ट पर्यंत तहकूब ठेवण्यात आली आहे. तर मूळ तक्रारदार अंजली दमानिया (Anjali Damania) हस्तक्षेप करण्याची मागितली असता त्यांना न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यास सांगितले.

दरम्यान, न्यायालयाने कृष्णा चमणकर व त्यांच्या कुटुंबीयांची दोषमुक्तता करताना काही महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.
तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, त्यांचे पुतणे, मुलगा किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना 13.5 कोटी रुपये दिल्याचा पुरावा नाही. 13.5 कोटी रुपयांचा अवाजवी फायदा आरोपी नंबर 1 (छगन भुजबळ) आणि 12 ते 17 (पंकज भुजबळ, समीर भुजबळ, तन्वीर शेख, इराम शेख आणि संजय जोशी) यांच्यापर्यंत पोहचला आहे. असे न्यायालयाने म्हंटले आहे.

Web Title :-  Maharashtra Sadan Scam | acb opposes chhagan bhujbal plea discharge maharashtra sadan scam case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rain in Maharashtra | राज्यात ‘या’ तारखेपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार

Milind Narvekar | ‘मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ED आणि CBI लावू’; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या स्वीय सहायकास धमकी

Anti Corruption | जातवैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मागितली लाच; प्राचार्यासह एक जण अटकेत