Maharashtra Sadan Scam | महायुतीला धक्का! अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ अडचणीत? उद्यापासून सुरू होणार ‘या’ प्रकरणाची सुनावणी

मुंबई : Maharashtra Sadan Scam | उद्या (१ एप्रिल) महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती मोडक यांच्या अध्यक्षतेखालील पिठासमोर ही सुनावणी होईल. छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) मिळालेली क्लीनचिट कायम राहते की न्यायालय पुन्हा शिका सुनावते, हे या सुनावणी नंतर ठरेल. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी घेतलेल्या पाठपुराव्यामुळे ही सुनावणी पुन्हा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) काळात हे प्रकरण पुन्हा सुरू झाल्याने महायुतीसाठी (Mahayuti) हा धक्का मानला जात आहे.

अंजली दमानिया यांनी यासंदर्भात माहिती देण्यासाठी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना निर्दोष सोडण्यात आले होते. या प्रकरणातील डिस्चार्जला आव्हान देणारे अपील गेली दिड वर्ष ऐकले जात नव्हते.

५ न्यायाधीशांनी नॉट बिफोर मी असे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयासमोर एक एसएलपी करून त्यावर ओरडी घेऊन, माननीय सरन्यायाधीशांकडून योग्य न्यायाधीशांसमोर त्याची लिस्टिंग करण्यासाठी विनंती करण्याचे आदेश मिळाले. शेवटी प्रकरण उद्या अनुक्रमांक १२ वर न्यायमूर्ती मोडक यांच्यासमोर ठेवण्यात आले आहे, दमानिया यांनी नमूद केले आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर या निर्णयाविरोधात अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
गेल्या दीड वर्षांपासून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी तारीख मिळत नव्हती.
अखेर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Justice Dhananjaya Y. Chandrachud)
यांनी हस्तक्षेप करून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार, उद्या याप्रकरणी सुनावणी होणार आहे.

छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना
त्यांनी जारी केलेल्या विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाल्याचा आरोप होता.
महाराष्ट्र सदन व इंडिया बुल्स (India Bulls) प्रकरणात राज्याच्या
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ११ जून २०१५ रोजी स्वतंत्र गुन्हे दाखल केल्यानंतर १५ जून २०१५ रोजी
ईडीने Enforcement Directorate (ED) सुद्धा भुजबळांविरोधात
काळा पैसा प्रतिबंधक कायदान्वये दोन गुन्हे दाखल केले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Court News | WhatsApp द्वारे हॉटेलमध्ये चालवल्या जाणाऱ्या बालेवाडी येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट मधील आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Supriya Sule On BJP | सुप्रिया सुळेंचा भाजपावर गंभीर आरोप, भाजपाने आमचे घर फोडले, मोठ्या भावाची बायको आईसारखी…

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा लढवणार?