धनगर आरक्षणासाठी हार्दिक पटेल मैदानात उतरणार ?

सांगली : पाेलीसनामा ऑनलाईन

आरक्षण हा अतिशय संवेदनशील व ज्वलंत विषय आहे. राज्यात मराठा व धनगर आरक्षणाच्या मागणीने ह्यावर्षी मोठ्या प्रमाणात जोर धरला आहे. राज्यभरात चर्चेचा विषय असलेल्या धनगर आरक्षणासाठी हार्दिक पटेल मैदानात उतरण्याची शक्यता आहे. १६ ऑक्टोबरला सांगली जिल्ह्यात होणाऱ्या धनगर आरक्षण मेळाव्यासाठी हार्दिकला निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे गुजरातमध्ये पाटीदार समाजासाठी आंदोलन केलेला हार्दिक पटेल आता महाराष्ट्रात धनगर आरक्षणासाठी आंदोलन करताना दिसेल, अशी चर्चा आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1b9c0957-cc79-11e8-bea4-e5ebe43ca9f9′]

‘अखेरचा लढा धनगर आरक्षणासाठी’ या मथळ्याखाली युवा भाजपचे अध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी १६ ऑक्टोबर रोजी सांगली जिल्ह्यातल्या आरेवाडीत एक मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी हार्दिक पटेलला निमंत्रण पाठवलेलं आहे .

२०१९ ची लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. त्या पार्श्वभूमीवर धनगर आरक्षणाचा मुद्दा जोर पकडत आहे. या मेळाव्यासाठी हार्दिक पटेलला आमंत्रित करण्यात आलं आहे. पाटीदार या समाजाचा नेता असलेल्या हार्दिकने हार्दिक पटेलने गुजरातमध्ये पाटीदार आरक्षणासाठी लढा पुकारलेला आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2102a34f-cc79-11e8-943d-db70a144a7dc’]

धनगर आरक्षण –

धनगर आणि धनगड अशा दोन वेगळ्या जाती असल्याचा सरकारचा दावा आहे. राज्यात एकही धनगड अस्तित्वात नाही. धनगर आणि धनगड ही फक्त प्रशासकीय चूक आहे. या प्रशासकीय चुकीमुळे धनगर समाजाला आरक्षणाचे काही लाभ मिळत नाहीत. धनगर समाजाचा आदिवासी जमातीमध्ये समावेश करून आरक्षणाचे लाभ मिळावेत अशी धनगर समाजाची मागणी आहे.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’28e81ebc-cc79-11e8-8669-855401adf7d5′]

आघाडी सरकारच्या काळात धनगर आरक्षणाचा हा प्रश्न पेटला तेव्हा फडणवीस स्वत: धनगरांच्या व्यासपीठावर गेले होते. त्यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रश्न सोडवू असं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र ४ वर्ष झाली तरी फडणवीसांनी धनगर आरक्षणाचं घोंगडं भिजत ठेवलं आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर आक्रमक झाले आहेत.