Maharashtra School Reopen | राज्यातील शाळा ‘या’ तारखेला सुरु होणार ! शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील शाळा सुरु (Maharashtra School Reopen) करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचे (Corona rule) पालन करुन शाळा सरु (Maharashtra School Reopen) होतील. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

https://twitter.com/ANI/status/1441363114096660481

राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात प्रयत्न करण्यात आला होता.
परंतु त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
मागील वर्षापासून शाळा बंद होत्या. कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बहुतांश ठिकाणी लसीकरण (Vaccination) झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.
शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेलं आहे.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शाळा पुन्हा सुरु करण्यास मान्यता दिली आहे.

 

Web Title : Maharashtra School Reopen | from 4 octomber schools in maharashtra will be start

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! शस्त्रक्रियेद्वारे गुघड्याखालील कापलेला पाय टाकला कचरा पेटीत, डॉक्टरासह आयावर गुन्हा दाखल

Gold Price Today | सोनं खरेदीची सुवर्णसंधी ! एका महिन्यात 1200 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या

Ajit Pawar | ‘लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’ (व्हिडीओ)