Maharashtra School Reopen | शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून इयत्ता 1 ली ते 4 थी ची शाळा सुरू होण्याचे संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा, महाविद्यालये सुरु (Maharashtra School Reopen) करण्यात आली. यानंतर आता प्राथमिक शाळाही (Elementary school) लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. राज्यातील 1 ली ते 4 थी शाळा सुरु करण्याबाबत सर्वच जिल्ह्यातील प्रमुख कार्यकारी अधिकारी सकारात्मक असून पुन्हा शाळा सुरु (Maharashtra School Reopen) करण्यावर जोर आहे. मुख्यमंत्री (CM), मंत्रिमंडळ (Cabinet) आणि कोव्हीड टास्क फोर्स (Covid Task Force) सोबत चर्चा करुन लवकरच राज्यातील पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी (दि.22) शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करत असताना जिल्ह्यातील शाळांचा आढावा घेण्यासाठी ऑनलाइन बैठक घेऊन चर्चा केली.

 

वर्षा गायकवाड म्हणाल्या…

 

ह्या आव्हानात्मक काळात आपल्या शाळा मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत (CEO) बैठकीत सुरु झालेल्या शाळांचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला.
त्याअनुषंगाने तयारी, लसीकरण (Vaccination) व नाविण्यपूर्ण उपाययोजनांचा आढावा घेतला.
या बैठकीत जवळपास सर्वच जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा पुन्हा सुरु (Maharashtra School Reopen) करण्यावर जोर दिला.

 

राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास साधता यावा, यासाठी शासनाने ‘आदर्श शाळा’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला असून यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालण्याचे निर्देश दिले.
शाळांच्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासाठी राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानाच्या (Rajmata Jijau Shaikshanik Gunvatta Vikas Abhiyan) प्रगतीचा आढावा घेतला.
पहिल्या टप्प्यात मराठवाडा विभागातील निजामकालीन शाळांची दुरुस्ती व पुनर्बांधणी केली.
हा सरकारचा महत्त्वाचा उपक्रम असून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

 

Web Title : Maharashtra School Reopen | possibility to start primary schools in maharashtra education minister prof varsha gaikwad hints

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BJP MLA Madhuri Misal | बिबवेवाडीतील अल्पवयीन मुलीच्या खून खटल्यासंदर्भात भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

Pune News | सोमवार, मंगळवार पेठेचा चेहरा मोहरा बदलणार ! पुणे महापालिकेतील सभागृह नेते बिडकर यांची ग्वाही

Ajit Pawar On Pune Metro | ‘शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम दिवाळीनंतर सुरू करणार’