Maharashtra School Reopen | 1 डिसेंबरपासून पहिलीपासूनचे वर्ग सुरु होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात येत्या 1 डिसेंबरपासून पहिलीपासून शाळा सुरु (Maharashtra School Reopen) करण्यास शालेय शिक्षण विभागाने (School Education Department) मान्यता दिली आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना (Guidelines) जारी करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी (Maharashtra School Reopen) या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केले आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक आज (सोमवार) जारी करण्यात आले आहे.

 

काय आहे नियमावली ?

– शाळा सुरु (Maharashtra School Reopen) करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण Covid vaccination (दोन डोस) झालेल्यांनाच शाळा, कार्यालयात प्रवेश देण्यात यावा.

– विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मास्कने पूर्णत: झाकलेले असले पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे

– सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड-19 साठीची 48 तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी (RT PCR Test) करावी.

– शाळेतील परिपाठ, स्नेह संमेलन व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अथवा स्पर्श होईल अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल.

– शिक्षक-पालक बैठक ऑनलाईन घ्याव्यात. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.

– वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असणार आहे.

– शाळा सुरु झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजनांबद्दल देखील विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार शाळेत व परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखावी.

– सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. यासाठी इच्छूक डॉक्टर पालकांची मदत घ्यावी. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांत भरवण्यात याव्यात.

– विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांची दररोज थर्मल स्क्रीनिंग (Thermal screening) चाचणी घ्यावी.

– सद्यस्थितीत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत.

– बस वाहनचालक व मदतनीस यांचे 100 टक्के लसीकरण झालेले असावे.

 

Web Title :- Maharashtra School Reopen | schools across the state start from december 1 education department announces rules

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

ATM Rule Change | मोठी बातमी ! ATM मधून कॅश काढण्याचे बदलले नियम, जाणून घ्या अन्यथा अडकतील पैसे

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 536 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Atrangi Re | पतिच्या लग्नात सारा अली खानचा जबरदस्त डान्स, चित्रपटातील पहिलं गाणं ‘चका-चक’ प्रदर्शित