Maharashtra School Reopen | पुढील आठवड्यात शाळा सुरु करण्याचा विचार?

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   Maharashtra School Reopen |राज्यात कोरोनाची स्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. राज्यात अनलॉक (Maharashtra unlock) नियमावली नुकतीच राज्य सरकारने (mva government) जाहीर केली आहे. आता मागील दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा लवकरच पुन्हा (School Reopen) सुरु होणार आहेत. राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरु करण्याचा शिक्षण विभागाचा विचार सुरु आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची (Education Department) पुढील आठवड्यात बैठक पार पाडणार आहे.

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभाग (Department of School Education) पुढील आठवड्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना बरोबर एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये ज्या ठिकाणी रुग्ण संख्या खूप कमी झाले आहे, अशा ठिकाणी उच्च माध्यमिक (High school) शाळा वर्ग सुरु करावेत का ? किंवा इयत्ता 9 वी, 10 वी या इयत्तेतील विद्यार्थी यांचे शालेय वर्ग सुरु करावेत का याबाबत चाचपणी करणार आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या आटोक्यात आली असल्याने तिथली परिस्थिती देखील सुधारत आहे.
अशा ठिकाणी काही प्रमाणात शाळा सुरु कराव्यात असा विचार शालेय शिक्षण विभागाचा आहे.
त्या अनुषंगाने पुढील आठवड्यामध्ये राज्यातील शालेय शिक्षण विभाग याबाबत बैठक घेणार आहे.
यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा करुन याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं शालेय शिक्षण विभागातील उच्चस्तरीय सूत्रांनी माहिती दिली.

 

ग्रामीण भागात वर्ग सुरु करण्याबाबत नियमावली

ग्रामीण भागात कोविडमुक्त ग्रामपंचायतीचा (Covid free grampanchayat) अंतर्गत असणारे इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु (Class 8 to Class 12) करण्याबाबत पालकांशी चर्चा करुन ठराव करावा यासाठी ग्रामपंचायत स्तरावर एक समिती गठित केली आहे.
त्याचे अध्यक्ष ग्रामपंचायतीचे सरपंच असणार आहेत. यामध्ये तलाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षणाधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, ग्रामसेवक, मुख्याध्यपक, केंद्रप्रमुख याची समिती याबाबत निर्णय घेईल.

शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी एक महिना संबंधित गावात कोरोनाचा रुग्ण आढळला नसावा.
शिक्षकांचे लसीकरण (Vaccination) करण्यात आले असावे, जर ते केले नसेल तर पहिल्यांदा लसीकर करावे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा परिसरात गर्दी करु नये.
विद्यार्थी बाधित झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करावी आणि शाळा निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांनी घ्यावी.
विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने उपचार सुरु करावेत.

 

Web Title : Maharashtra School Reopen | the decision to start school next week in maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

NCB ची नवी मुंबईत मोठी कारवाई ! आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कराला अटक, तस्कराच्या हल्ल्यात एनसीबीचे 2 अधिकारी जखमी

LIC Money Back Plan | केवळ 150 रुपयात घ्या LIC ची पॉलिसी ! मिळेल 19 लाखांचा फायदा; पाहिजे तेव्हा पैसे परत; जाणून घ्या कसे?

BJP MLA | ज्येष्ठ BJP कार्यकर्त्याच्या घरी आमदाराची टर उडवणारी टिपणी; थेट चंद्रकांत पाटील, मुनगंटीवारांकडे तक्रार