Maharashtra School Start | चला दप्तर भरा ! शैक्षणिक वर्ष 13 जूनपासून तर शाळा 15 जूनला सुरू होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra School Start | शालेय विद्यार्थ्यासाठी (Student) एक महत्त्वाची माहिती आहे. राज्यातील शाळा म्हणजेच नवीन शैक्षणिक वर्ष (New Academic Year) 13 जून 2022 रोजी पासून सुरु (Maharashtra School Start) होणार आहे. राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता आणि सुसंगती आणण्यासाठी 13 जूनपासून शैक्षणिक वर्ष शाळांनी सुरु करावे तर 15 जूनपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना निर्गमित कराव्यात अशा सूचना दिल्या. याबाबत माहिती शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे (School Education Commissioner Suraj Mandhare) यांनी दिली.

 

येत्या 13 व 14 जून रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोरोना त्याचबरोबर आरोग्य विषयक बाबींच्या अनुषंगाने उद्बोधन आदींचे आयोजन करावे. आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना या सूचना दिल्या आहेत. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता तेथील शैक्षणिक वर्ष 23 जून रोजी सुरू होऊन 27 जून रोजी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Maharashtra School Start)

या दरम्यान, नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असतानाच महाराष्ट्रात एकिकडे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. म्हणून पुन्हा एकदा पालक वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी घेऊन शाळा उघडल्या जातील, शाळांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील त्याचबरोबर शाळांमध्ये मास्क सक्ती करायची की नाही याचा निर्णय काही दिवसांत घेण्यात येईल अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

 

Web Title :- Maharashtra School Start | school starts from 13th june while student attendance
from 15th instructions of education commissioner suraj mandhare marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा