BMC चा मोठा निर्णय ! मुंबईत 31 डिसेंबरपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या महाराष्ट्रात शाळा-महाविद्यालयांबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बीएमसीने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, आता मुंबईत 31 डिसेंबरपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत. यापूर्वी गुजरातनेही 23 नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले होते, पण नंतर वाढत्या कोरोना संसर्गामुळे सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला. विशेष बाब म्हणजे मार्चमध्ये लागू झालेल्या लॉकडाउनमुळे शैक्षणिक संस्था बंद पडल्या आहेत.

महाराष्ट्रात कोरोना विषाणू थांबण्याचे नाव घेत नाही. कोविड 19 भारतातील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 79,738 इतकी आहे. आतापर्यंत कोविड 19 चे 17 लाख 63 हजार 55 प्रकरणे आढळून आली असून, त्यापैकी 46,356 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक बाधित जिल्हा पुणे आहे. आतापर्यंत येथे 3 लाख 44 हजार 2 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 7 हजारांहून अधिक लोकांचा जीव गमावला आहे. त्याचबरोबर 3 लाख 19 हजार 998 लोक निरोगी झाल्यानंतर घरी परतले आहेत. देशात कोरोना रुग्णांची संख्या 90 लाखांच्या पार गेली आहे, तर 4 लाख 43 हजार 642 प्रकरणे अद्याप अ‍ॅक्टिव्ह आहेत.

गुजरातमध्ये शाळा सुरू करण्यासाठी नवीन तारखा नाहीत
गुजरात सरकारने आपल्या पहिल्या आदेशात म्हटले आहे की, 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरू केली जातील, परंतु सणानंतर वाढलेल्या प्रकरणांनंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. सध्या सरकारने नवीन तारखांची घोषणा केलेली नाही. या महिन्यात, सरकारने घोषणा केली होती की, 23 नोव्हेंबरपासून 9 वी ते 12 वीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि अंतिम वर्षाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संस्था उघडतील. 11 नोव्हेंबर रोजी शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चुडासामा यांनी ही घोषणा केली होती. त्यांनी यासाठी एसओपीही शेअर केला होता.