आगीच्या घटनेनंतरही ‘सीरम’मधून म्यानमार, सेशेल्स, मॉरिशसला ‘लस’ रवाना

पुणे : सीरम इन्स्टिट्युटमधील एका इमारतीला गुरुवारी दुपारी आग लागून त्यात पाच जणांचा होरपळून मृत्यु झाला. या घटनेची संपूर्ण जगाने दखल घेतली. असे असेल तरी सीरम इन्स्टिट्युटमधील काम सुरळीत सुरु राहीले. ठरलेल्या नियोजनानुसार सीरम इन्स्टिट्युटमधून मध्यरात्री म्यानमार, सेशेल्स, मॉरिशस या देशांना कोविशिल्डची लस रवाना करण्यात आली. पुण्यातून एका खास वाहनाने त्या मुंबईच्या आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला आणण्यात आल्या़. तेथून त्यात विमानाने म्यानमार, सेशेल्स आणि मॉरिशस या देशाकडे रवाना झाल्या.