मोबाईल अ‍ॅपवर आता करता येणार ‘सेट’ची ‘स्टडी’

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणाऱ्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (SET ) जर तुम्ही देणार असाल, तर या परीक्षेचा अभ्यास तुम्हाला आता मोबाईलद्वारे करता येणार आहे. यासाठी ‘एमएच-सेट’ हे ॲप अमित भालेराव आणि रोशन केदार यांनी विकसित केले आहे.

सावित्रीबाई फुले विद्यापीठांमार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला ही परीक्षा देता येते. डिजिटलच्या या युगात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ‘एमएच-सेट’ हे विनामूल्य ॲप नुकतेच कार्यान्वित करण्यात आले असून भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेले अमित भालेराव आणि एम.टेक. झालेले रोशन केदार या दोघांनी ते विकसित केले आहे.

या ॲपमध्ये मागील आठ वर्षपूर्वीचे प्रश्नपत्रिका संच हे उत्तरा सहित असून यामध्ये पेपर क्रमांक एकचा समावेश आहे. परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी मागील काही वर्षांतील पेपरचा सराव करतात. या ॲपमुळे हा अभ्यास करणे अधिक सोपे होईल, असे अमित भालेराव यांनी सांगितले. या ॲपवर सेटच्या गेल्या आठ वर्षांतील पेपर एक आणि त्यांची उत्तरे आहेत. येणाऱ्या काळात प्रश्‍न -उत्तरांचे विश्‍लेषणही देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे केदार यांनी म्हटले आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –

हे दोन पदार्थ टाळा ; अन्यथा ‘स्नायू’ होतील कमजोर

केसांच्या समस्या समूळ नष्ट करा ; ‘हे’ आहेत उपाय

केसांसह त्वचेसाठीही आवळा गुणकारी ; रसाने त्वचा होईल गोरी

काळजी घ्या ; कमी झोप घेण्याचा थेट संबंध ‘ब्लड प्रेशर’शी