पहिल्यांदाच ठाकरे कुटूंब ‘किंगमेकर’ नव्हे तर ‘किंग’, उध्दव ठाकरेंच्या डोक्यावर सजणार CM पदाचा ‘मुकूट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेनं आदित्य ठाकरेंना पुढे करत निवडणूक लढवली होती. परंतु आता स्थिती बदलली आहे. भाजपसोबत काडीमोड झाल्यानंतर शिवसेना आता आपले विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन करत आहे. त्यामुळे आता ठाकरे परिवार महाराष्ट्राच्या राजकारणात किंगमेकर नाही तर किंग बनणार आहे. शरद पवारांसारख्या नेत्यासोबत सामंजस्य ठेवत सरकार चालवणं तेही भाजपसारखा मजबूत विरोधी पक्ष समोर असताना उद्धव ठाकरेंसाठी हे नक्कीच सोपं असणार नाही.

शिवसेना- काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांसोबत आघाडी करत सरकार चालवणं नक्कीच सोपं असणार नाही. तेदेखील तेव्हा जेव्हा भाजपसारखा मजबूत पक्ष समोर आहे. एवढेच नाही तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अखेरपर्यंत आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यावर सहमत झाले नाही. हेच कारण आहे की, शिवसेनेनं आदित्य यांच्याऐवजी उद्धव ठाकरेंना सीएम करण्याचा डाव टाकला.

उद्धव ठाकरे सोबत असणाऱ्या पक्षांसोबत चांगल्या प्रकारे सरकार चालवू शकतात. भाजपसारख्या मजबूत विरोधी पक्षासोबत कसं निपटायचं हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. ही पहिलीच वेळ असणार आहे की, ठाकरे परिवार किंगमेकरच्या भूमिकेतून थेट सत्तेत असणार आहे. अशात ठाकरे परिवारावर विरोधी पक्ष थेट हल्ला करेल. ठाकरे परिवार सत्तेत आल्यानंतर आता विरोधी पक्षांसाठी त्यांच्यावर निशाणा साधणं सोपं होणार आहे.

ठाकरेंच्या डोक्यावर CMचा मुकूट
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबाची वेगळी ओळख आहे. राज्यात त्यांची बरोबरी करायला कोणतंच कुटुंब समोर उभं राहिलेलं नाही. याचे मुख्य कारण हेच मानलं जात आहे की, सत्ता भलेही या कुटुंबाच्या आसपास होती परंतु हे कुटुंब सत्तेपासून कायमच दूर राहिलं आहे. हे पहिल्यांदाच होणार आहे की, सत्तेची कमान ठाकरे कुटुंबाच्या हाती असणार आहे. आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की, सीएम पदासोबतच उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख राहतात की, आदित्य ठाकरेंकडे पक्षाची धुरा सांभाळतात.

Visit : Policenama.com