‘या’ कारणामुळं भाजपची ‘साथ’ सोडली, उध्दव ठाकरेंनी आमदारांच्या बैठकीत सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार बनणे जवळपास ठरलेलेच आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत तिन्ही पक्ष आघाडीची घोषणा करू शकतात. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांची बैठक पार पडली असून त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजप सोबतची आपली युती का तोडली ? हे सांगितले.

बैठकीत उद्धव ठाकरेंनी सांगितले की, “आपल्या सगळ्यांना हे समजायला हवं की भाजप सोबतची २५ वर्ष जुनी मैत्री का तोडली ? कारण भाजप शिवसेनेसोबत नेहमी खोटं बोलत आल्याने हे पाऊल उचलावे लागले. तसेच आपण सगळ्यांनी पाहिलेच आहे की गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेला काय सांगितले गेले आणि काय केले गेले.”

तसेच भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाण्याचे कारण देखील त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे म्हणाले, “आता आपण एक नवीन आघाडीत जात आहोत आणि त्याबाबतचा हा शेवटचा टप्पा आहे आणि आज सायंकाळ पर्यंत हे स्पष्ट होणार आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्री होणार की नाही याबाबत बोलणे टाळले असून शिवसेना आमदारांकडून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद स्वीकारावे याची मागणी होताना दिसत आहे. याबाबत उद्धव ठाकरेंनी सांगितले की, ते वेळ आल्यावर योग्य तो निर्णय घेतील.

आज होऊ शकते आघाडीची घोषणा
महत्वपूर्ण माहिती म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या आज शेवटची बैठक होईल आणि त्यात युती होण्यावर शिक्कामोर्तब होऊन लगेचच त्याबाबतीत घोषणाही होऊ शकते. राष्ट्रवादीकडून देखील हे स्पष्ट झाले आहे की मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असून उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावे कारण ते पक्षाचा चेहरा असून या पदाची जबाबदारी ते पेलू शकतात.

नवीन युतीच्या आधारे मुख्यमंत्री पद हे शिवसेनेच्या खात्यात जाताना दिसत असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्री राहू शकते. तसेच सर्व पक्ष मंत्रिमंडळाबाबब विचार मंथन करत आहेत. त्यानुसार सांगितले जात आहे की मंत्रिपदासाठी १४-१४-१४ चा फॉर्मुला वापरला जाऊ शकतो.

Visit : Policenama.com