शिवशाही बसला भीषण अपघात; 38 जण जखमी तर 17 गंभीर

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील शिवशाही बसला तेलंगणा राज्यात भीषण अपघात झाला असून या अपघातात 38 जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांपैकी 17 जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातात जखमी झालेले प्रवासी हे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. हा अपघात आज (रविवार) पहाटे चारच्या सुमारास तेलंगणा राज्यातील कामारेड्डी जिल्ह्यात झाला.

नांदेडहून हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटली. यामध्ये 38 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापैकी 17 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड आगाराची शिवशाही बस (एमएच 06 बीडब्ल्यू 4413) ही शनिवारी (दि.13) रात्री 11 वाजता नांदेड-हैदराबाद फेरीवर धाव होती. आज (रविवार) पहाटे चारच्या सुमारास तेलंगणा राज्यातील कामारेड्डीच्या अलिकडे बसचा अपघात झाला.

बस रस्त्याच्या खाली उतरली आणि दोन ते तीन पलट्या घेतल्या. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये बस चालक, वाहक आणि इतर 36 प्रवासी प्रवास करीत होते. अपघातात 17 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. शिवशाही बसच्या चालकाच्या डोक्याला मार लागला असून वाहकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. चालक विजयकुमार वाघवसे आणि वाहक अब्दुल करीम अशी या दोघांची नावे आहे. जखमींवर कामारेड्डी येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.