Maharashtra SSC 10th Result 2022 | ठरलं ! दहावीचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर होणार

0
360
Maharashtra SSC 10th Result 2022 | maharashtra ssc 10th result 2022 maharashtra board ssc result tomorrow 17th june 2022
File Photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Maharashtra SSC 10th Result 2022 | मागील आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. आता दहावी बोर्डाच्या निकालाची (Maharashtra SSC 10th Result 2022) प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालकांना होती. ती प्रतीक्षा संपली आहे. उद्या (शुक्रवार) 17 जून 2022 रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली.

 

“महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary And Higher Secondary Education) मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इयत्ता. 10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दिनांक 17 जून 2022 रोजी दुपारी 1:00 वाजता ऑनलाईन जाहीर होईल.” अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

 

 

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 20 जून पर्यंत दहावीचा निकाल जाहीर होईल असे सांगण्यात आले होते. परंतु त्यानुसार उद्या म्हणजे 17 जून रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होईल.

 

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ –

http://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

 

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा