१० वीच्या निकालाबाबत अद्यापही ‘संभ्रम’ कायम ; निकालाबाबत बोर्डाचा खुलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आज दहावीचा निकाल लागणार असा अशी माहिती महाराष्ट्र स्टेट बोर्डाने दिली होती. मात्र दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा पुन्हा वाढली आहे. आज दहावीचा निकाल  लागणार नाही. असा खुलासा बोर्डाच्या अध्यक्षांनी केला आहे.

मागच्यावर्षी २८ मेला निकाल लागला होता. यावर्षी मे महिन्यात नाही. परंतु जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागेल अशी आशा होती. परंतु विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लवकरच maharesult.nic.in या बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जाहीर होईल. या वेबसाईटवर विद्यार्थ्याना आपला निकाल पाहायला मिळेल. आज जरी निकाल लागला नाही तरी ७ किंवा ८ जुन ला निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. परंतु अजून मात्र निकालाची तारिख जाहीर झाली नाही. असा खुलासा बोर्डाने केला आहे. त्यामुळे १० वी च्या विध्यार्थाना अजून १-२ दिवस निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

You might also like