विद्यार्थ्यांना ‘ते’ गुण देण्यास बोर्डाचा ‘ग्रीन’ सिग्‍नल

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – प्रत्येकवर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांना २० मार्क हे शाळेकडून मिळत असतात. त्यामुळे विदयार्थ्यांना चांगले मार्क्स पडतात. पण यावेळेस दहावीच्या विदयार्थ्यांना शाळेकडून मार्क्स देण्यात न आल्याने त्यांची टक्केवारी खूप कमी झाली आहे. त्यामुळे आता ११ विच्या प्रवेशाची चिंता या विदयार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना होती. मात्र त्याला आता ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

कारण CBSE आणि ICSE च्या मुलांना हे गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे यात SSC बोर्डाची मुले मागे पडतील. याची काळजी सर्वाना होती. त्यामुळे अकारावीच्या प्रवेशासाठी CBSE आणि ICSE च्या विद्यार्थ्यांचे फक्त लेखी परिक्षेचेच गुण ग्राह्य धरले जावेत. यासाठी विनोद तावडे हे मनुष्यबळ मंत्रालयाशी चर्चा करणार असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांना थोडा कि होईना पण दिलासा मिळाला आहे.

दरम्यान शाळा मुलांना कुठलेही निकष न लावता मार्क्स देतात. त्यामुळे त्यांची गुणवत्ता नाही. फक्त टक्केवारीचा वाढते त्यामुळे शाळेच्या अंतर्गत गुण विद्यार्थ्याना दिलेच नाहीत. परंतु निकालाच्या टक्केवारीत स्टेट बोर्ड मागे पडू नये म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने राज्य सरकारचा निर्णय मान्य केला म्हणून स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्मण झाले आहे.

आरोग्यविषयक वृत्च

त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन
श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘
सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात