Exit Poll : मराठवाड्यावर देखील भाजप – शिवसेनेचा ‘कब्जा’, काँग्रेस – राष्ट्रवादीला ‘लोळवणार’ ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – विधानसभा निवडणूकीचे भवितव्य गुलदस्त्यात कैद झाले आहे. परंतू आता आलेल्या IPSOS च्या एक्झिट पोलमध्ये भाजप शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमताचा अंदाज दिसत आहे. मराठवाड्यात देखील भाजप-शिवसेनेने आपला गड शाबित ठेवल्याचे दिसत आहे.

मराठवाड्यात भाजप सेना युतीला 48 पैकी 44 जागांवर विजय मिळेल अशी शक्यता आहे. आता भाजपला 23 तर शिवसेनेला 21 जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीला मराठावाड्यात 4 जागा मिळतील अशी शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला निवडणूकीच्या आखाड्यात सत्ताधाऱ्यांनी लोळवलं असं एक्झिट पोलवरुन दिसतंय.

एक्झिच पोलचा अंदाज – (मराठवाडा)
महायुती – 44

महाआघाडी – 4

भाजप – 23

शिवसेना – 21

काँग्रेस – 2

राष्ट्रवादी – 2

2014 पासून मराठवाडा भाजप शिवसेनेचा बालेकिल्ला
इतिहासात मराठावाडा हा हैद्राबादच्या संस्थानमधून वेगळा झाला. त्यानंतर मराठवाड्यातील राजकीय समीकरण बदलत गेलं. मुक्ती संग्रामच्या लढ्यात मराठवाड्याला काँग्रेसचे मोठे योगदान लाभले. त्यामुळे मराठवाड्यात काँग्रेसचे वर्चस्व होते. मराठवाड्यात शरद पवारांचा राजकीय दबदबा देखील चांगला राहिला. परंतू 2014 साली मोदी लाटेने मराठवाड्याचे राजकीय चित्र पालटले, भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला लोळवलं. तेव्हापासून मराठवाड्यात भाजप शिवसेनेचा गड मजबूत झाला. त्यावेळी लोकसभेत भाजपने 16 तर शिवसेनेने 11 जागांवर विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादीला 9 आणि काँग्रेसला 9 जागांवर विजय मिळवता आल्या होत्या.

मराठवाड्यातील 2014 चा निकाल –

भाजप – 16

शिवसेना – 11

राष्ट्रवादी – 9

काँग्रेस – 9

अपक्ष – 02

एमआयएम – 1

पुन्हा एकदा केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ?
राज्यात सत्तेत येण्यासाठी 145 हा जादूई आकडा आहे. एकूण 288 जागांवर निवडणूका लढल्या गेल्या. एक्झिट पोलच्या निकालानुसार महायुतीला 288 पैकी 243 जागा मिळतील.

मेगाभरतीचा फटका
राज्यात भाजपकडून विधानसभेच्या तोंडावर मेगाभरती करण्यात आली होती. यात उस्मानाबाद आणि बीडमधून राष्ट्रवादीला हादरा बसला होता. राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते भाजपच्या गळाला लागला. शरद पवारांचे नातेवाईक राणा जगजितसिंह यांनी देखील राष्ट्रवादीला राम राम ठोकला. बीडमधील जयदत्त क्षीरसागर हे देखील राष्ट्रवादी सोडून महायुतीच्या तंबूत दाखल झाले. यामुळे खुद्द शरद पवारांना प्रचारासाठी महाराष्ट्र फिरावा लागला. या कारणाने राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली.

बहीण की भाऊ
परळीतील निवडणूक तशी टफ फाइट मानली जात आहे. येथे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेसाठी त्यांच्या पक्षाकडून पूर्ण ताकद पणाला लावण्यात आली होती. परंतू आता एक्झिट पोलचा अंदाज आल्यानंतर भाजपला मतदारांचा कौल जात असल्याचे स्पष्ट होत असल्याने राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांत नाराजीेचे वातावरण दिसत आहे.

लातूरमध्ये देशमुख राखणार का गड?
काँग्रेसचा सर्वात मजबूत बालेकिल्ला असलेल्या लातूरात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणूकीत काँग्रेसची वाताहात झाली होती, त्यामुळे यंदाच्या विधानसभेत आपला गढ राखण्यासाठी देशमुख कुंटूंबांने आपली ताकद पणाला लावली आहे. यंदा दोघे भाऊ लातूर शहर आणि ग्रामीण मधून उतरले होते. अमित देशमुख दुसऱ्यांदा आपले नशीब अजमावत आहे. तर धीरज देशमुख हे ग्रामीणमधून पहिल्यांदाच रिंगणात उतरले आहेत. परंतू एक्झिट पोलच्या अंदाजानंतर काँग्रेसच्या गोटात देखील निराशा पसली आहे. दोन्ही भावांनी विश्वास दर्शवला होता की ते लातूरातून बाजी मारतील. परंतू मराठवाड्यातून दोनच जागा मिळले असे स्पष्ट झाल्याने देशमुख कुटूंबात निराशेचे वातावरण आहे.

Visit  :Policenama.com