काँग्रेस, राष्ट्रवादीला काही भविष्य नाही : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

परळी : पोलीसनामा ऑनलाइन – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. परळीत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेवर चांगलाच निशाणा साधला आहे. ज्या पक्षांना काहीच भविष्य उरलेले नाही त्यांना मतदान तरी कशाला करायचे असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

काँग्रेस – राष्ट्रवादीचा जिल्हयात अथवा मराठवाड्यात एकही आमदार, खासदार नाही त्यांच्या मागे जाताच कशाला ?’ असा प्रश्न यावेळी पंकजा मुंडे यांनी नागरिकांसमोर उपस्थित केला. तसेच महाराष्ट्रात पुन्हा भाजपचेच सरकार येणार आहे, विनाकारण मतं व्यर्थ घालू नका, असे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आणि जनतेला आवाहन केलं आहे.

महा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मी तुमची सेवा केली आहे, पुढेही करत राहणार. म्हणून तुम्ही मला आशीर्वाद द्या. असे आवाहन यावेळी परळीतील जनतेला पंकजा मुंडे यांनी केले आहे. परळीत मुंडे विरुद्ध मुंडे असा संघर्ष या विधानसभेला पहायला मिळणार आहे. त्याच अनुषंगाने पंकजा मुंडेंनी जोरदार तयारी सुरु केल्याचे पहायला मिळत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like