सातार्‍याच्या पोटनिवडणूकीत उदयनराजेंच्या विरोधात आघाडीचा ‘हेवीवेट’ उमेदवार ?

सातारा : पोलिसनामा ऑनलाईन – सातारा जिल्ह्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर आता या ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उदयनराजे भोसले यांच्याविरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता या ठिकाणी उदयनराजे भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात थेट लढत होणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून याठिकाणी चव्हाण हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्यास काँग्रेसला हा मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार असल्याची माहिती देखील मिळत आहे. त्यामुळे आता काँग्रेस पुन्हा साताऱ्याला आपला बालेकिल्ला बनविण्याचा प्रयत्न करताना दिसून येणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सहमतीने पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली असून आता याठिकाणी टफ फाईट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता या ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीबरोबरच या ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुकीकडे देखील सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Visit : policenama.com