महाराष्ट्र राज्य बी अँड सी कामगार संघाचा सुनील कांबळे यांना पाठिंबा जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांना समाजातील विविध संघटनांचा पाठिंबा वाढत आहे. आज महाराष्ट्र राज्य बी अँड सी कामगार संघाने सुनील कांबळे यांना पाठिंबा जाहीर केला असून त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

सुनील कांबळे यांनी निवडणूक प्रचारात चांगली आघाडी घेतली आहे. सुनील कांबळे यांच्या उमेदवारीनंतर काँग्रेस व अन्य पक्षातील तगड्या कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश करत कांबळे यांचा झंझावाती प्रचार सुरू केला आहे. अशातच कांबळे यांना समाजातील विविध घटकांकडून पाठींबा वाढू लागला आहे. आज महाराष्ट्र राज्य बी अँड सी कामगार संघाने कांबळे यांना पाठिंबा देताना संघाचे सर्व सदस्य जे वर्ग तीन आणि चार मध्ये काम करतात, हे तुमच्या पाठीशी आहेत, असे पत्र कांबळे यांना दिले आहे.

चतुर्थ श्रेणी पदावर काम करणाऱ्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची मोठी संख्या कॅन्टोन्मेंट मतदार संघात आहे. निश्चितच त्यांच्यामुळे मी मतदानात मोठी आघाडी घेईन असा विश्वास सुनील कांबळे यांनी व्यक्त केला आहे. रिपब्लिकन जनशक्ती आणि श्री गणेश वीरशैव लिंगायत गवळी धर्मदाय संस्था यांनीही पाठिंबा दिला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी