विरोधी पक्षनेतेपदी ‘या’ काँग्रेस नेत्याची वर्णी लागणार ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आजपासून विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात होत आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारत अनेक आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. त्यात विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील आता मंत्री झाल्याने विरोधीपक्षनेतेपदी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरु झाली आहे. आजपासून राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेतेपदाची निवड होऊ शकते.

काँग्रेसने नुकतेच गटनेतेपदी निवड केलेल्या विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांची नेमणूक करावी अशी मागणी करणार आहोत अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

त्याचबरोबर खालच्या सभागृहात आम्ही या सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याचे काम करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले. विरोधी पक्षनेत्यांना फोडण्याचे काम केले जात आहे. कुठल्या रस्त्याने हे लोक घेवून जात आहे. लोकशाहीत हे योग्य आहे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित करत भाजपच्या कार्यशैलीवर टीका केली.

दरम्यान, या सरकारने पाच वर्ष काहीच काम केले नसल्याचे म्हणत चहापानावर बहिष्कार टाकला. तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर याविषयी बैठक देखील पार पडली.

आरोग्यविषयक वृत्त –

सुंदर दिसण्यासाठी ‘हे’ ७ पदार्थ चेहऱ्यावर चुकूनही लावू नका

अपचनाच्या समस्येसाठी ‘वज्रासन’ फायद्याचे

केळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे

अर्थरायटिसला दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश